* || दत्ताश्रय गोवीः || अंतरीचे बोला *शाश्वत* सर्वदाः | अंतर्वाणी ज्यासीं बोधतो आनंदा || १ || अंतरीचे पूर्ण निर्मळ प्रकाश कायाः | येथची सुपूर्ण वैकुंठ लाया || २ || चारू म्हणे सर्वथा उत्पत्तीक ज्या किन्ही | तोचीं तों परम | एकपूर्णम् || ३ ||| * गोवी अर्थम् - दत्ताश्रय, जो सर्वथा एकपूर्ण आहे. तोचं सकळाश्रयातील उत्पत्तीक अर्थात् उत्पत्ती करणारा, जननी समान आहे. असा हा दत्ताश्रय *अंतर्वाणी* ह्या तत्त्वामध्ये शाश्वतार्थाने व्यापून आहे. *आत्मिक जागृती* करणारा तपस्वी सर्वप्रथम ह्या अंतरीच्या तत्त्वाशी एकनिष्ठ तथा एकत्वमय होतो. अशा ह्या तत्त्वाशी एकत्वमय झाल्यानंतर जीवात्म्याला *सुपूर्ण वैकुंठ* प्राप्तीचा मार्ग प्राप्त होतो, अर्थात् साधकाला ह्या साधनातीत अवस्थेत दत्ताश्रयात्मधिनत्वचं ज्ञात होते.

Comments