Charudatta Thorat's Letter to PM of India
* विष्णुभक्त चारूदत्त यांचा प्रधानमंत्र्यांसाठी "भक्तीयोगाचा सांगावा" !
* विष्णूभक्त चारूदत्त जी का भारत के प्रधानमंत्रीजी के लिएँ भक्तीयोगपूर्ण "पत्र" !
* Charudatta Thorat's Spiritual Letter To PM of India.
------
महाराष्ट्र साधु संत विचारवंत महापुरुषांची भुमी आहे . या भुमीचा सहवास भल्या भल्यांना मोहीत करून ध्येय गाठण्याची उर्जा देणारा स्तोञ आहे. संतांची परंपरा लाभलेल्या या भुमीवर ज्याने पाय ठेवला तो आपल्या कार्यात उंची गाठतो हा इतिहास आहे.
काय नाही या भुमीत ? छ. शिवाजी महाराजांचे गनिमी शौर्य आहे , संभाजी महाराजांचा त्याग आहे , महात्मा ज्योतीबा फुलेंचा समरसतेचा विचार आहे. विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेतून पाझरणारा मानवतेचा स्तोञ आहे . अशा भारावलेल्या वातावरणातून उर्जेचा अखंड स्तोञ पाझरणाऱ्या वारीची परंपरा शेकडो वर्षापासुन चालत आली आहे .
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देश आणि विदेशातील भाविकांना अभ्यासकांना मोहात पाडणारा हा उत्सव खरे तर महाराष्ट्राच्या लोकधारा संस्कृतीचा अविभाज्य भाग नव्हे तर गाभा आहे. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ आणि कार्तिक महिन्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीसाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेने धाव घेतात . उन , वारा , पाऊस व थंडी कशाचीही पर्वा न करता शेकडो मैल पायपीट करित लाखो वारकरी शिस्तबद्ध दिंडीने पांडूरंगाच्या क्षण भराच्या मुख दर्शनासाठी जातात आणि काही क्षणात माऊलीचा चेहरा याची देही याची डोळा साठवून आयुष्यभरासाठी कृतकृत्य होत माघारी फिरतात . प्रचंड उर्जा देणारा हा क्षण महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंञ्याने अनुभवला आहे. ही अनुभूती देशाच्या पंतप्रधानांना अद्याप घेता आली नाही.
भविष्यात ही अनुभूती मिळविण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला आली आहे . आणि म्हणूनच नाशिकच्या के.टी.एच.एम . महाविद्यालयात टि . वाय .बीएचे शिक्षण घेत असलेला विष्णुभक्त चारूदत्त महेश थोरात याने गेल्या चार वर्षापासुन संस्कृत तसेच अभंगरूपी पञ स्वरूपात पञ पाठवून या वारकरी दिंडीला निमंञीत केले आहे . संस्कृत सदृश्य महागुप्त भाषेत नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पञात चारूदत्त म्हणतो , जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात असलेल्या रूढीपरंपरा उत्सवामध्ये पंतप्रधानांनी सहभाग नोंदवून अनुभूती घेतली आहे.
एकदा महाराष्ट्राची थोर परंपरा असलेल्या या वारीत चार पाऊले चालून विश्ववेगळी अनुभूती घ्या .
आमच्या वारकऱ्यांमध्ये असलेला उत्साह आणि त्यातून ओसांडणारी अखंड उर्जा अनुभवा. विठू माऊलीवर असलेली निष्ठा आणि भक्तीचा भाव पहा , शेकडो मैल पायी प्रवासानंतरही विठू भक्तांच्या चेहऱ्यावरील थकव्याचा मागमुसही नसलेले समाधान अनुभवा . हि अनुभूती पंतप्रधान जेव्हा माघारी जाताना सोबत नेतील तेव्हा भविष्यकालीन वाटचालीत ते कधीही मागे पाहणार नाहीत . असा भाव असलेले निमंञण पञ चारूदत्त ने पंतप्रधानांच्या दिल्ली स्थित कार्यालयाला पाठवले आहे.
-
सौ. विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र.
( VishnuBhakta Charudatta Kavya Vishnu Sadan Temple, Maharashtra.)
Comments