Posts

Showing posts from April, 2019
Image
काव्य विष्णु सदन प्रतिष्ठान, नाशिक. (महाराष्ट्र राज्य) || मतदानोत्सवम् : विष्णुभक्त चारूदत्त || मतदान केवळ न कर्तव्य, हक्कही जाणा आपुला ! *मतदानोत्सव* कराया साजरा मतदारांनो चला चला || एक मताची किंमत अनमोल, सुयोग्य शासक बसवायला ! *मतदानोत्सव* कराया साजरा मतदारांंनो चला चला || अधिकार लोकशाहीचा हा उन्नतीर्थ बजवायला ! *मतदानोत्सव* कराया साजरा मतदारांंनो चला चला ||| *मतदान* हा मतदाराचा केवळ हक्कचं नाही, तर लोकशाहीतील महत्त्वाचे कर्तव्यदेखिल आहे. *मतदारराजा* च्या मताची किंमत अनमोल आहे, जी देशामध्ये सुशासक निर्माण करण्यांस प्रभावी भूमिका बजावते. भारतीय लोकशाहीने दिलेला हा अनमोल "मताधिकार" प्रत्येक भारतीय नागरिकाने बजावयास हवा. हा लोकतंत्राचा अविभाज्य सोहळा, अर्थात् *मतादानोत्सव* आहे.
Image
|| विष्णुभक्त चारूदत्त ||
Image
* || दत्ताश्रय गोवीः || अंतरीचे बोला *शाश्वत* सर्वदाः | अंतर्वाणी ज्यासीं बोधतो आनंदा || १ || अंतरीचे पूर्ण निर्मळ प्रकाश कायाः | येथची सुपूर्ण वैकुंठ लाया || २ || चारू म्हणे सर्वथा उत्पत्तीक ज्या किन्ही | तोचीं तों परम | एकपूर्णम् || ३ ||| * गोवी अर्थम् - दत्ताश्रय, जो सर्वथा एकपूर्ण आहे. तोचं सकळाश्रयातील उत्पत्तीक अर्थात् उत्पत्ती करणारा, जननी समान आहे. असा हा दत्ताश्रय *अंतर्वाणी* ह्या तत्त्वामध्ये शाश्वतार्थाने व्यापून आहे. *आत्मिक जागृती* करणारा तपस्वी सर्वप्रथम ह्या अंतरीच्या तत्त्वाशी एकनिष्ठ तथा एकत्वमय होतो. अशा ह्या तत्त्वाशी एकत्वमय झाल्यानंतर जीवात्म्याला *सुपूर्ण वैकुंठ* प्राप्तीचा मार्ग प्राप्त होतो, अर्थात् साधकाला ह्या साधनातीत अवस्थेत दत्ताश्रयात्मधिनत्वचं ज्ञात होते.
काव्य विष्णु सदन प्रतिष्ठान, नाशिक. (महाराष्ट्र राज्य)
: पाठ नाम : || अभक्त दर्शनम्  || नाही ज्यासीं संगती शुद्धतेची सर्वथा | आणीक पाहीं तो सदैव ना-ना व्यथाः || १ || ज्याने "शुद्ध संग" नामक सभेचा स्विकार केला नाही, अशा जागृतीरहित साधकाने अभक्तीचाचं स्विकार केला आहे. ध्यानता लोचन एकचित्त पूर्ण | एकत्व नारायण | इह नाही ज्यांसीं आण | तो अभक्तीक जाण || २ || ज्याने "एकचित्त" नामक ध्यानबीजभाव धारण केला नाही, त्याला "एकत्व" नारायणरुपी मूळबीज साध्य झाले नाहीं, अर्थात्, अभक्त हा ह्या गूढयोगत्वापासून कायमचं वंचित राहतो. परमानंदु परम् योगीकेची प्राप्ती | परि भोगातीत अभक्ताची विकृतीः || ३ || योगप्राप्तीर्थ "योगत्व" प्राप्तशील साधक हा सदैव योगातीत-आपकर्मामधून "परमानंद" साध्य करतो.परंतु, भोगप्राप्तीर्थ "भोगत्व" प्राप्तशील "अभक्त" हा सदैव भोगातीत-प्रत्येक एका कर्मातून विकृतीचीचं प्राप्ती करतो!  दत्ताश्रयानीज अभक्तीक गुण वदलें | साधकु साध्यार्थे | परमाकारणेंचियेः || ४ || "परम् साध्याच्या प्राप्तीर्थ मार्गात येणार्या अनेक आसक्तीवर्ध अडथळ्यांपासून रक्षिण्...
सन आनंदाचा | आहे गुढीपाडवा | अंधार रिघूनी भवप्रकाश घरात यावा || १ || विघातदायी जे-जे तुटूनी जावे सर्व | चैतन्याची माळ जुळावी | हे आनंदाचे पर्व || २ || गुढी उभारा चैतन्याची, परमानंद प्राप्तावा | अंधार विरोनी जावा, भव प्रकाश घरात यावा || ३ || हेची वरदान ईशापाशी ठेवोनी पाहीन | चारू नीजहरीठायी | नित्य चैतन्य लेईन || ४ |||
|| विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा || जीव पांडूरंग | देव पांडूरंग | भाव पांडूरंग | प्रभाव पांडूरंग || १ || बोलीजे मज भवगाथा पांडूरंग | ज्ञानाचिया स्वामी हाची सुसंग || २ || आत्म बोलू पाहीं | अवघी चित्ताश्रयी | अखंडदत्ताश्रयी | हाचीं गूढभेद || ३ || चारू देखा सदा | अनाथांचा दीनु | काव्यविष्णुसदनु | प्रकाशद्वीप || ४ ||| सौजन्य : काव्य विष्णु सदन प्रतिष्ठान
* Charudatta Thorat knowledge Temple * -------- * विष्णुभक्त चारूदत्त थोरात ज्ञानमंदिर * -------- * Email : kavyavishnusadanpratishthan@gmail.com --------