Charudatta Thorat Nashik
Charudatta Thorat
राजकवी महाकवी विष्णुभक्त चारूदत्त ह्यांचे निवासस्थान.
" अखंडज्ञानयोग " हा त्यांचा जीवनमार्ग. त्यांनी आजपर्यंत कोणतेही भौतिक धर्मग्रंथ तथा त्याविषयक ग्रंथांचे अध्ययन केलेले नाही. तरीही स्वप्रचितीने तथापी आपल्या गूढ जीवनशैलीने आजवर त्यांनी लाखो ग्रंथ लिहिलेले आहेत. वयाच्या अगदी लहाणपणापासून ते अविरत ह्या भौतिक जगतात कुठेही नसलेले गुप्तयोगीक ग्रंथ ते अविरतपणे लिहित आहेत. त्यांच्यामते त्यांचे जीवन हे सर्वथा परमेश्वराच्या, भगवान दत्ताश्रयरूपी विष्णुच्याचं ज्ञानासाठीचं समर्मित आहे, असे ते वारंवार सांगतात. त्यांनी हे गूढ लिखान त्यांच्या संपूर्ण घरभर, छतावर, भांड्यांवर, कपाटावर लिहिलेले आहे. वह्यापुस्तके तर त्यांच्या गूप्तज्ञानाने तुंबच्या तुंब भरलेली आहेत. त्यांनी लिहिलेले सर्वकाही ज्ञानसाहित्य हे सत्यात्मरूपी "दत्ताश्रय" ("दत्तात्रय" नव्हे) आहे, असे ते सांगतात. ते स्वतःस सत्यास्तिक जाणतात. त्यांचे हे ज्ञान ऐकण्याकरिता दूर-दूर प्रदेशातून, देशांतून जिज्ञासु, ज्ञानी, योगी, साधक लोकं येथे भेटी देण्यांस येतात. आपणही येऊ शकतात.. कृपया वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या !
Comments