|| भारतभक्त चारूदत्त || + + + +++++ ||भारत अभंगगाथा || धन्य आजिं देह या भूवरी जन्मला | ज्याकारण्ये जन्म सार्थकी जाहला ||१|| मायभूमी भारतमाता, गुण हिचे अगम्य गाता | हृदय कळवळे, स्मरोनी हिची "स्वातंत्र्य गाथा" ||२|| या भारतभूचे ठायी, वैभव अपार दडले | याची भारत भूमीमध्ये, टिळक-आगरकर घडले ||३|| देई आम्हा वरदान माते रक्षाया सरहद्द | उन्मत्त आतंक्यांपासोनी, बळ देई आम्हा सिद्ध (हस्थ) ||४|| तूझ्याची ठायी जनन मरण पुनरपि गे माते | जन्म सार्थकी तव मांडीलागी होतसे ||५|| चारू म्हणे येश्वर्य जे इथे, स्वर्गाहुनी गोड | जन्मोजन्मी असेल माझी, याची भूईलागीं ओढ ||६||| * * * * निर्मित : 7Oct2019 *